Controversial statement by a senior BJP leader regarding jeans worn by women; Said ...

टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करत म्हटले, मुख्यमंत्री म्हणतायं, महिलेच्या पायाकडे पाहिले तर तिने गमबूट घातले होते तर गुडघ्यावरची जीन्स फाटलेली होती. मुख्यमंत्री साहेब महिलांना वर-खाली, पुढे-मागे फक्त निर्लज्ज माणूस पाहतो. जीन्स नव्हे तुमची बुद्धी फाटलेली आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.

    डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी फाटलेली जीन्स घालण्याबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीनंतर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथसिंह रावत यांच्यावर टीका केली.

    टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करत म्हटले, मुख्यमंत्री म्हणतायं, महिलेच्या पायाकडे पाहिले तर तिने गमबूट घातले होते तर गुडघ्यावरची जीन्स फाटलेली होती. मुख्यमंत्री साहेब महिलांना वर-खाली, पुढे-मागे फक्त निर्लज्ज माणूस पाहतो. जीन्स नव्हे तुमची बुद्धी फाटलेली आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.

    शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तिरथसिंह रावत यांच्या विधानावर भाष्य केले आहे. महिलांना त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरून मूल्यांकन करणाऱ्या पुरुषांमुळे देशातील संस्कृती आणि संस्कारावर फरक पडतो. मुख्यमंत्री साहेब विचार बदला, तरच देश बदलेल, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले आहे.

    तीरथ सिंह रावत यांच्या या वक्तव्यावर काँग्रसेने टीका केली आहे. काँग्रेस नेते संजय झा यांनी ट्वीट करत म्हटले, फाटकी जीन्स घातल्यामुळे आपली संस्कृती धोक्यात येते. त्यामुळे महिलांनी ते टाळायला हवे, असे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. भाजपा, हे तुमचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आहेत. तुम्ही याचे समर्थन करता का? असा सवाल झा यांनी उपस्थित केला.