खोटारड्यांची जीभ झडेल; भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

उत्तर प्रदेशातील बागपत येथील भाजपा खासदार सत्यपालसिंह यांचे एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर चवन्नीछाप लोकं काहीही लिहितात, असे त्यांनी म्हटले आहे. अशी लोकं पुढील जन्मात माणूस बनणार नाही, पुढच्या जन्मात त्यांची जीभ झडेल आणि ते काहीही बोलू शकणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.

    लखनौ : उत्तर प्रदेशातील बागपत येथील भाजपा खासदार सत्यपालसिंह यांचे एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर चवन्नीछाप लोकं काहीही लिहितात, असे त्यांनी म्हटले आहे. अशी लोकं पुढील जन्मात माणूस बनणार नाही, पुढच्या जन्मात त्यांची जीभ झडेल आणि ते काहीही बोलू शकणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.

    उत्तर प्रदेश आणि हरयाणा या दोन राज्यांना जोडणारा एक पूल तयार करण्यात येत आहे. यमुना नदीवरील या पुलावरून विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी सिंह यांनी टीका केली होती. विरोधकांनी दावा केला होता की हा पूल त्यांनी बनविला आहे.

    यावरून सत्यपाल सिंह म्हणाले की, चवन्नी छाप लोकं काहीही म्हणतात, ते म्हणतायत की आम्ही पूल बनविला आहे, आम्ही बनवतो आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे की हा पूल कोणी बनविला आहे. देवालाही हे माहिती असून जगालाही माहिती आहे की पूल कोणी बनविला आहे. छपरौली इथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली आहे.

    हे सुद्धा वाचा