कोरोना पॉझिटिव्ह पत्नीच्या देखभालीसाठी मिळाली नाही सुटी; पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा

उत्तर प्रदेशमधील झाशीमधील सर्कल ऑफिसर (सीओ) मनीष सोनकर यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सोनकर यांनी आपली कोरोनाबाधित पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची देखभाल करण्यासाठी सुटी मिळत नसल्याचे कारण दिले आहे. सोनकर यांनी झाशीचे एसएसपी रोहन पी कनय यांच्यासहीत राज्यपालांकडेही राजीनाम्याची एक प्रत पाठविली आहे.

    लखनौ : उत्तर प्रदेशमधील झाशीमधील सर्कल ऑफिसर (सीओ) मनीष सोनकर यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सोनकर यांनी आपली कोरोनाबाधित पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची देखभाल करण्यासाठी सुटी मिळत नसल्याचे कारण दिले आहे. सोनकर यांनी झाशीचे एसएसपी रोहन पी कनय यांच्यासहीत राज्यपालांकडेही राजीनाम्याची एक प्रत पाठविली आहे.

    एसएसपी रोहन पी कनय यांनी सोनकरांच्या राजीनाम्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या राजीनाम्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोनकर हे २००५ च्या तुकडीतील पीपीएस अधिकारी आहेत. सध्या ते झाशीचे सर्कल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सोनकर हे पत्नी आणि मुलीसोबत राहतात.

    करोना कालावधीमध्ये सोनकर हे एकाच घरात राहूनही आपल्या पत्नी आणि मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या खोलीत राहतात. मात्र दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नीला खूप ताप आला. त्यानंतर २० एप्रिल रोजी सोनकर यांनाही खूप ताप आला. तेव्हापासून आतापर्यंत सोनकर यांनी पाच वेळा कोरोनाची चाचणी केली जी निगेटीव्ह आली. त्यामुळे औषधे घेऊन सोनकर कामावर जात होते.

    सोनकर यांची पत्नी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पत्नी आणि मुलीची काळजी घेतानाच सोनकर हे स्वत: आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत लॉकडाऊन संदर्भातील सरकारी बैठका, तपासण्या यांसारख्या गोष्टींसाठी हजर राहत होते. ३० एप्रिल रोजी सोनकर यांच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आयसोलेशनमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोनकर यांची चार वर्षांची मुलगी त्याच्यासोबत राहू लागली. मुलीची सर्व जबाबदारी सोनकरांवर आली. त्याच दरम्यान पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली.