दुदैवी ! मतमोजणीत आघाडीवर असणाऱ्या तृणमूलच्या ‘या’ उमेदवाराचा कोरोनाने मृत्यू

प्रचाराच्या अंतिम तारखेपर्यंत काजल सिन्हानी मोठ्या जोमाने व उत्साहाने प्रचार केला. मात्र मतदानाच्या आदल्याच दिवशी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते

    कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मत मोजणी सुरू होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बंगालमधील खरदह मतदारसंघातील उमेदवार तृणमूल काँग्रेसचे नेते काजल सिन्हा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्वात धक्कादायकबाब म्हणजे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी आघाडी घेतली. ते विजयाच्या अगदी जवळ असल्याचे दिसून आले आहे.

    प्रचाराच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांनी मोठ्या जोमाने व उत्साहाने प्रचार केला. मात्र मतदानाच्या आदल्याच दिवशी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. आज तकने दिलेल्या बातमीनुसार काजल सिन्हा यांना २१ एप्रिल रोजी कोलकात्याच्या आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. २२ एप्रिलला खरदह मतदारसंघात मतदान झाले होते. त्या दिवशी काजल सिन्हा रुग्णालयातच होते. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी २५ एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.