Corona lost her job; It's time for the teacher to pick up the trash

ओडिशातील भुवनेश्वर येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेवर सध्या घंटागाडी चालविण्याची वेळ आली आहे. स्मृतिरेखा बेहरा या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. मात्र, कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे त्या कचऱ्याची गाडी चालविण्याचे काम करत आहेत. स्मृतिरेखा बेहरा या भुवनेश्वरमधील पथबंधा या भागात राहत असून घरखर्चासाठी त्या महानगरपालिकेची घंटागाडी चालविण्याचे काम करत आहेत.

    भुवनेश्वर : कोरोना संकटामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन केल्याने आर्थिक संकट कोसळल्यामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येकजण कठीण प्रसंगाला सामोरे जात आहे. यामध्येच एका शिक्षिकेवर चक्क कचरा उचलण्याची वेळ आली आहे.

    ओडिशातील भुवनेश्वर येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेवर सध्या घंटागाडी चालविण्याची वेळ आली आहे. स्मृतिरेखा बेहरा या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. मात्र, कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे त्या कचऱ्याची गाडी चालविण्याचे काम करत आहेत. स्मृतिरेखा बेहरा या भुवनेश्वरमधील पथबंधा या भागात राहत असून घरखर्चासाठी त्या महानगरपालिकेची घंटागाडी चालविण्याचे काम करत आहेत.

    कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी त्यांनी हे काम स्वीकारल्याचे त्या सांगतात. कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझ्या कुटुंबाला दोन वेळचे जेवणही नीट मिळाले नाही. मला दोन मुली आहेत. निदान त्यांना तरी जेवण मिळावे म्हणून मी लोकांकडून पैसे उधार मागितले. पण, हे फार दिवस नाही चालले. या महामारीच्या काळात मी सगळ्यात वाईट दिवस पाहिले आहेत. सुरुवातीला मी घरीच मुलांची शिकवणी घेऊन घर चालवत होते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हे कामदेखील फार काळ टिकले नाही. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे स्मृतिरेखा म्हणाल्या.