कोरोना रुग्णांना आता ‘या’ गंभीर आजाराचा धोका, कोणता आहे आजार ? : जाणून घ्या सविस्तर

रोनापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये रक्त गोठण्याचा रोग होत असल्याचं समोर आलं आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कोरोनानंतर दुर्मिळ रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सामान्य व्यक्तींपेक्षा कोविड झालेल्या रुग्णांना तब्बल 100 पट जास्त असतो. तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मतानुसार कोरोना विषाणू शरीरात शिरल्यानंतर सूज यायला लागते.ज्याचा थेट परिणाम हृदयाचा ठोकाच्या गतीवर पडतो आणि हळूहळू शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. याला रक्त गोठणे म्हणतात. जागतिक स्तरावर एक संशोधन करण्यात आले आहे. ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या 15 ते 30 टक्के रुग्णांमध्ये हा आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणतात.

    नवी दिल्ली : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं आहे. दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे.

    दरम्यान अशातच आता कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये रक्त गोठण्याचा रोग होत असल्याचं समोर आलं आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कोरोनानंतर दुर्मिळ रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सामान्य व्यक्तींपेक्षा कोविड झालेल्या रुग्णांना तब्बल 100 पट जास्त असतो.

    तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मतानुसार कोरोना विषाणू शरीरात शिरल्यानंतर सूज यायला लागते.ज्याचा थेट परिणाम हृदयाचा ठोकाच्या गतीवर पडतो आणि हळूहळू शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. याला रक्त गोठणे म्हणतात. जागतिक स्तरावर एक संशोधन करण्यात आले आहे. ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या 15 ते 30 टक्के रुग्णांमध्ये हा आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणतात.

    दरम्यान, अचानक पायावर सूज, वेदना, पायाची सूज मांडीपर्यंत जाणे, रक्ताचे गोळे फुप्फुसांकडे जाणे, त्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होणे ही ‘डीव्हीटी’ची प्रमुख लक्षणे आहेत. श्‍वास घेण्यास त्रास सुरू झाल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात भरती करावे लागते. हातामध्ये ‘डीव्हीटी’ असल्यास हात अचानक दुखणे, सुजणे, हातांची हालचाल कमी होणे ही लक्षणे दिसतात.