Corona report of eight lions came positive; Excitement at the Nehru Zoological Park in Hyderabad

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना पहिल्यांनाच प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमध्ये 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.

    हैदराबाद : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना पहिल्यांनाच प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमध्ये 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.

    आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्युलर बायोलॉजीने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी केलेली नाही. या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करण्यात येणार आहे.

    या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत.