भाजपच्या दोन्ही खासदारांना कोरोनाचा विळखा ; कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर दुसरा कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल ( Sunny Deol ) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive ) आला आहे. हिमाचल प्रदेशच्या (H.M) आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आल्याची माहिती दिली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल ( Sunny Deol ) गेल्या काही दिवसांपासून कुल्लूमध्ये राहत होते. कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी नियोजन करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या कोरोनाचे उपचार (Corona Treatment) सुरू आहेत. अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हिमाचल प्रदेशच्या (H.M) आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आल्याची माहिती दिली आहे.

सनी देओल यांच्यावर मुंबईत काही दिवसांपूर्वी खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या मनातील कुल्लूमधील फार्महाऊसवर राहायला गेले होते. सध्या सनी देओल यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या राज्यसभेचे खासदार अभय भारद्वाज यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. भाजप खासदार भारद्वाज यांचं मंगळवारी चेन्नईमध्ये निधन झालं. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालवली. अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.