मध्य प्रदेशमधील धक्कादायक प्रकार, कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर ११ दिवस सुरु होते उपचार ?

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) टीकमगढ जिल्ह्यात (Tikamgadh)कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर ११ दिवस (Treatment On dead Corona Patient For 11 Days)उपचार सुरु होते. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र घ्यायला गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

    भोपाळ: मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) टीकमगढ जिल्ह्यात (Tikamgadh) एक भयानक प्रकार समोर आला आहे.  इथे कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर ११ दिवस (Treatment On dead Corona Patient For 11 Days)उपचार सुरु होते. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र घ्यायला गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना संसर्गानं मृत्यू झालेल्या व्यक्तीला कागदोपत्री बरा झाल्याचं दाखवण्यात आल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक विभागांचे उंबरठे झिजवायला लागले.

    टिकमगढ जिल्ह्यातील एकता कॉलनीतील रहिवासी रामनारायण श्रोती यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. सहा दिवस उपचार केल्यानंतरही त्यांची तब्येत नीट होत नव्हती. त्यामुळे १८ एप्रिलला त्यांना डॉक्टरांशी चर्चा करुन घरी नेण्यात आलं आणि १९ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी रुग्णालयाकडं डिस्चार्ज कार्ड मागण्यासाठी अनिरुद्ध श्रोती यांनी संपर्क केला असता तुम्ही रुग्णाला स्वत: नेल्यानं डिस्चार्ज कार्ड बनवण्यात आलं नसण्याच सांगण्यात आलं. अखेर अनिरुद्ध श्रोती यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली.

    अनिरुद्ध श्रोती यांना रुग्णालयानं माहितीच्या अधिकारात रामनारायण श्रोती यांच्या कोरोना रिपोर्टसह उपचाराची माहिती दिली आहे. रामनारायण श्रोती यांना ३० एप्रिलला बरं झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आल्याचं रुग्णालयानं कळवलं आहे. मात्र त्यांचा मृत्यू १९ एप्रिलला झाला होता. रुग्णालयानं श्रोती यांच्या मृत्यूनंतर अकरा दिवस उपचार केले. त्यांना विविध इंजेक्शन आणि औषधं दिली गेली असल्याचं म्हटलं आहे.या प्रकरणामुळे टिकमगढच्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुढं आला आहे.कोरोनातून बरं झाल्याचा उल्लेख डिस्चार्ड कार्डवर असल्यानं अनेक अडचणी येत असल्याचं अनिरुद्ध श्रोती म्हणाले आहेत.