नैसर्गिक जलस्त्रोतांवर हल्ला ? अहमदाबादच्या साबरमती नदीच्या पाण्यात आढळला कोरोना, दोन तलावांमध्येही विषाणूचे अस्तित्व

साबरमती नदीत कोरोना विषाणू (Corona Virus Found In Sabarmati River)आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता या पाण्यामध्ये कोरोना विषाणूचे अस्तित्व आढळून आले.

    कोरोनाविषयी रोज नवी माहिती समोर येत आहे. या विषाणूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वेगवेगळ्या रुपामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी हा विषाणू आढळत आहे. अशीच एक घटना गुजरातमधून(Gujrat) समोर आली आहे. साबरमती नदीत कोरोना विषाणू (Corona Virus Found In Sabarmati River)आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता या पाण्यामध्ये कोरोना विषाणूचे अस्तित्व आढळून आले.

    साबरमतीशिवाय अहमदाबादचे दोन मोठे तलाव कांकरिया आणि चांदोला मध्येही कोरोना विषाणू सापडल्याचे समजते. साबरमतीपूर्वी गंगा नदीशी जोडलेल्या वेगवेगळ्या सांडपाण्यामध्ये देखील कोरोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले. आता नैसर्गिक पाण्यातही कोरोनाचे विषाणू दिसू लागल्याने चिंता वाढली आहे.

    आयआयटी गांधीनगरने अहमदाबादमधील साबरमती नदीतून पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांचा अभ्यास केला गेला. प्राध्यापक मनीष कुमार यांच्या म्हणण्यानुसार, तपासणी दरम्यान कोरोना विषाणू पाण्याच्या नमुन्यातून सापडला जो अतिशय धोकादायक आहे. पृथ्वी व विज्ञान विभागाचे प्राध्यापक असलेले मनीष कुमार म्हणाले की, पाण्याचे नमुने दर आठवड्यात ३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२० या काळात नदीतून घेण्यात आले. नमुना घेतल्यानंतर याची तपासणी केली गेली आणि करोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले.

    साबरमती नदीतून ६९४ नमुने, कांकरिया तलावातील ५४९ आणि चांदोला तलावामधून ४०२ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, असा विश्वास संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्व नैसर्गिक जल स्त्रोतांचे नमुने घ्यावे, कारण व्हायरसचे बरेच गंभीर म्यूटेशन कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये दिसून आले आहेत, असे मनीषकुमार म्हणाले.