कोरोनाने वडिलांचा मृत्यू; कोरोनामुळे रक्ताचे नातेवाईकही दुरावले

कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण देशात चालू आहे. कोरोना विषाणूमुळे माणूस माणसापासून दुरावला आहे. विषाणूचा धोका असल्याने रक्ताचे नातेवाईकही दुरावले आहेत. लांबचे नातेवाईक तर मृतदेहाजवळही येत नाहीत. अशीच काहीशी घटना सध्या उत्तर प्रदेशातून समोर येत आहे. कोरोनाकाळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्याचे समोर आले. मात्र आता तर कोरोनाची बाधा झाल्यामुळे मरण पावलेल्या पित्याच्या मृतदेहास शिवण्यासही त्यांच्या मुलांनी नकार दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    लखनौ : कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण देशात चालू आहे. कोरोना विषाणूमुळे माणूस माणसापासून दुरावला आहे. विषाणूचा धोका असल्याने रक्ताचे नातेवाईकही दुरावले आहेत. लांबचे नातेवाईक तर मृतदेहाजवळही येत नाहीत. अशीच काहीशी घटना सध्या उत्तर प्रदेशातून समोर येत आहे. कोरोनाकाळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्याचे समोर आले. मात्र आता तर कोरोनाची बाधा झाल्यामुळे मरण पावलेल्या पित्याच्या मृतदेहास शिवण्यासही त्यांच्या मुलांनी नकार दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे राम ललित असून त्यांना तीन मुले आहेत. कोरोनाची बाधा झाल्यावर मुलांनी रामललित यांना एका रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती न सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवले. घरी आल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रामललितचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर सख्ख्या मुलांनीही त्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी जेसीबीचे यंत्र बोलावून एक मोठा खड्डा खणला आणि जेसीबीने तो मृतदेह उचलून त्या खड्ड्यात पुरून टाकला.

    दरम्यान, गावातील सरपंच श्रलयोगानंद गौतम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या मुलांना अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्यास आम्ही विरोध केला होता. पण त्यांनी ती गोष्ट मानली नाही आणि आपल्या वडिलांवर खड्ड्यात पुरून अंत्यसंस्कार केले. जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून या मुलांवर कारवाई करण्याच्या दिशेने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.