पत्नीच्या पेन्शनमधून पतीला मिळणार पोटगी

जवळपास सात वर्षांपूर्वी किशोरीलाल यांनी कौटुंबिक न्यायालयात आपल्या पत्नीविरुद्ध दावा दाखल केला. यात त्यांनी आपल्याला पत्नीकडून निर्वाह भत्ता मिळण्याची मागणी केली. या प्रकऱणात न्यायालयाने किशोरीलाल यांच्या बाजूने निकाल दिला

तुमच्या पतीला दरमहा २ हजार रुपये पोटगी द्या, असा आदेश उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर कौटुंबिक न्यायालयाने एका महिलेला दिलाय. संबंधित पती सध्या चहा विकून उदरनिर्वाह करतो. हे पती-पत्नी गेल्या दहा वर्षांपासून वेगळे राहत होते.

वकील बालेशकुमार तायल यांनी दिलेल्या माहिनीनुसार, खतौली निवासी किशोरी लाल सोहंकार यांचे ३० वर्षांपूर्वी कानपूरमधील मुन्नी देवी यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर २० वर्षं त्यांनी एकत्र संसार केला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. या वादानंतर मुन्नी देवी यांनी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

वाद झाला, तेव्हा मुन्नीदेवी या कानपूरमध्ये भारतीय सैन्यात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. काही वर्षांनी मुन्नीदेवी सेवेतून निवृत्त झाल्या. तर किशोरीलाल हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी चहाचे छोटे दुकान चालवत होते. सध्या दोघंही उतारवयात आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर मुन्नी देवी यांना दरमहा १२ हजार रुपये पेन्शन मिळते आहे. जवळपास सात वर्षांपूर्वी किशोरीलाल यांनी कौटुंबिक न्यायालयात आपल्या पत्नीविरुद्ध दावा दाखल केला. यात त्यांनी आपल्याला पत्नीकडून निर्वाह भत्ता मिळण्याची मागणी केली. या प्रकऱणात न्यायालयाने किशोरीलाल यांच्या बाजूने निकाल दिला. मुन्नी देवी यांनी पतीला दरमहा दोन हजार रुपये द्यावेत, असा निर्णय न्यायालयाने दिला.