केंद्रीय गृहमंत्र्यांना कोर्टाचे समन्स ; २२ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मानहानी प्रकरणात हा शहा यांना समन्स पाठविण्यात आला आहे. ११ ऑगस्ट, २०१८ रोजी कोलकाताच्या मेयो रोडवर आयोजित भाजपच्या एका रॅलीत अमित शहा यांनी तृणमूल संसद सदस्यांविरुद्ध काही अपमानकारक वक्तव्ये केली होती, असा आरोप आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील मानहानी प्रकरणात एका न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्री अमित शहांना २२ फेब्रुवारीला सुनावणीस हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मानहानी प्रकरणात हा शहा यांना समन्स पाठविण्यात आला आहे. ११ ऑगस्ट, २०१८ रोजी कोलकाताच्या मेयो रोडवर आयोजित भाजपच्या एका रॅलीत अमित शहा यांनी तृणमूल संसद सदस्यांविरुद्ध काही अपमानकारक वक्तव्ये केली होती, असा आरोप आहे.

    प्रकरण काय?

    पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांनी अनेकदा अभिषेक बॅनर्जींवरून ममतांवर निशाणा साधाला आहे. ममतांवर घराणेशाहीचा आरोप करण्यापासून अभिषेक यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करत टीका करण्यात आली आहे.