केरळ निवडणूक: CPI ने जारी केली उमेदवारांची यादी; केरळ निवडणूक

तिकीट न मिळालेल्या मंत्र्यांमध्ये अर्थमंत्री टीएम थॉमस इसाक, पीडब्ल्यूडी मंत्री जी सुधाकरन, शिक्षणमंत्री प्रोफेसर जी. रवींद्रनाथ, सांस्कृतिक मंत्री एके बालन व उद्योगमंत्री ईपी जयराजन यांचा समावेश आहे. तसेच तिकीट मिळालेल्या नेत्यांमध्ये एमबी राजेश, पी. राजीव, वीएन वासवान व केएन बालगोपालसारख्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे

    तिरुवनंतपूरम: केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी) आपल्या ८३ उमेदवारांची यादी जारी केली आहे. या यादीत ९ अपक्षांचा सामवेश आहे. पार्टीने टू टर्म नॉर्म अंतर्गत जे आमदार दोनदा निवडून आले आहे, त्यांचे तिकीट कापले आहे. यात ३३ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. यात सरकारमधील ५ मंत्री व विधानसभा अध्यक्षदेखील आहेत. लेफ्ट पक्ष पहिल्यांदाच टू टर्म नॉर्मचा वापर करीत आहे. देशातील हा पहिला असा पक्ष आहे ज्याने निवडणुकीच्या अगदी तोंडावर इतके मोठे पाऊल उचलले आहे. तिकीट न मिळालेल्या मंत्र्यांमध्ये अर्थमंत्री टीएम थॉमस इसाक, पीडब्ल्यूडी मंत्री जी सुधाकरन, शिक्षणमंत्री प्रोफेसर जी. रवींद्रनाथ, सांस्कृतिक मंत्री एके बालन व उद्योगमंत्री ईपी जयराजन यांचा समावेश आहे. तसेच तिकीट मिळालेल्या नेत्यांमध्ये एमबी राजेश, पी. राजीव, वीएन वासवान व केएन बालगोपालसारख्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे. ज्यांनी२०१९ ची निवडणूक लढविली होती व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षाकडून १२ महिला उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे.

    टू टर्मने नाराज नेते
    सीपीआयएमकडून राज्याच्या नेत्यांकडून घेण्यात आलेल्या टू टर्म नियमावर पक्षाचे नेते व कार्यकर्ते नाराज आहे. राज्याच्या अनेक भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात येत आहे.