Cricketer's 'debut' in politics; Cricketer Manoj Tiwary wins Bengal Assembly elections

माजी भारतीय क्रिकेट खेळाडू मनोज तिवारी यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीत आपला विजय नोंदविला आहे. पहिल्यांदाच निवडणूक मैदानात उतरलेल्या मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षासाठी शिवपूर जागेवर आपले नाव कोरले आहे.

    कोलकाता : माजी भारतीय क्रिकेट खेळाडू मनोज तिवारी यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीत आपला विजय नोंदविला आहे. पहिल्यांदाच निवडणूक मैदानात उतरलेल्या मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षासाठी शिवपूर जागेवर आपले नाव कोरले आहे.

    मनोज तिवारी यांनी भाजपाच्या डॉ. रतिन चक्रवर्ती यांचा पराभव केला. निवडणुकीसाठी टीएमसी सोडून भाजपामध्ये सहभागी झालेल्या डॉ. चक्रवर्तींनी हावडाचे महापौरपद भूषविले होते.

    बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचा नवीन चेहरा म्हणून मनोज तिवारी यांना हावडाच्या शिवपूर मतदारसंघातून उतरविले होते. डाव्या पक्षांनी फॉरवर्ड ब्लॉकचे अनुभवी नेते डॉ. जगन्नाथ भट्टाचार्य यांना आपला उमेदवार बनवून चौथ्यांदा या जागेवर उतरविले होते. त्यांनादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागले.