vikas dubey

उत्तरप्रदेशातील कानपूरच्या बिकरू कांडप्रकरणी न्यायालयीन चौकशीच्या अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहे. विकास दुबेवर दाखल असलेल्या 65 पैकी 21 खटल्यांच्या फायली गायब आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरही 21 खटल्यांच्या फाईल्सचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही.

    कानूपर : उत्तरप्रदेशातील कानपूरच्या बिकरू कांडप्रकरणी न्यायालयीन चौकशीच्या अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहे. विकास दुबेवर दाखल असलेल्या 65 पैकी 21 खटल्यांच्या फायली गायब आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरही 21 खटल्यांच्या फाईल्सचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही.

    हे खटले कानपूरच्या शिवली, कल्याणपूर, चौबेपूर आणि बिल्लौरमध्ये दाखल करण्यात आले होते. यावरून गँगस्टर दुबेचा पोलिस आणि प्रशासनात किती दबदबा होता, याची जाणीव होते.

    बिकरू हत्याकांड आणि गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायालयीन आयोगाने आपला 132 पृष्ठांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून दुबे आणि त्याच्या टोळीला कानपूरमध्ये स्थानिक पोलिसांसह महसूल आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांचे संरक्षण प्राप्त होते, असा खुलासा करण्यात आला आहे.