धक्कादायक – तरुणाने होणाऱ्या बायकोला लग्नाच्या खरेदीसाठी बोलावलं आणि साधला डाव, गळा दाबून केली हत्या

लग्नाच्या खरेदीसाठी नवऱ्याने आपल्या होणाऱ्या बायकोला बोलावून घेतलं आणि त्यानंतर ती तरुणी मृतावस्थेत सापडली. पती जितीनने होणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून(Man killed his would be wife) केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    उत्तर प्रदेशमधील(Uttar Pradesh) मोरादाबादमध्ये(Crime In Moradabad) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या खरेदीसाठी नवऱ्याने आपल्या होणाऱ्या बायकोला बोलावून घेतलं आणि त्यानंतर ती तरुणी मृतावस्थेत सापडली. पती जितीनने होणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून(Man killed his would be wife) केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    टीना आणि जितीन यांच्या लग्नाची तारीख ठरली होती. लग्नाची तयारी सुरु झाली होती. अशातच सोमवारी टीनाला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच जितीनने फोन केला. लग्नासाठी साड्या खरेदी करण्यासाठी भेट असं जितीनने टीनाला सांगितलं. त्यानंतर टीनाला तिच्या आईने सकाळी ११ वाजता जवळच्या बसस्थानकापर्यंत सोडलं, असं टीनाचा नातेवाईक विपीन याने सांगितलं.

    जितीन दुपारी घरी आला, मात्र टीनाचा पत्ताच नव्हता. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली.  दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पोलिसांना एका गावाजवळ रस्त्याच्या कडेला पडलेला टीना मृतावस्थेत सापडली. ही माहिती पोलिसांनी टीनाच्या घरी दिली. जितीनला भेटायला गेलेल्या टीनाचा अचानक मृत्यू झाला.

    टीनाचा मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी जितीनला अटक केली. जितीनला टीनाशी लग्न करायचं नव्हतं त्यामुळे जितीनने तिची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

    लग्न करायचं नव्हत तर नकार द्यायला हवा होता,असं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया टीनाच्या कुटुंबियांनी दिली आहे.