Crocodile protects the temple; The specialty of the temple in the middle of the lake

केरळमध्ये कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वरम तालुक्यामध्ये अनंतपूर नामक गाव आहे. या गावामध्ये असलेल्या सरोवराच्या मधोमध अनंतपद्मनाभस्वामी मंदिर आहे. याच मंदिराचा उल्लेख अनंतपूर मंदिर म्हणूनही करण्यात येतो. हे मंदिर पद्मनाभस्वामीचे ‘मूलस्थान’ मानले जात असल्यामुळे या मंदिरामध्ये भाविकांची सतत मोठी गर्दी पहावास मिळते.

    तिरुवनंतपूरम : केरळमध्ये कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वरम तालुक्यामध्ये अनंतपूर नामक गाव आहे. या गावामध्ये असलेल्या सरोवराच्या मधोमध अनंतपद्मनाभस्वामी मंदिर आहे. याच मंदिराचा उल्लेख अनंतपूर मंदिर म्हणूनही करण्यात येतो. हे मंदिर पद्मनाभस्वामीचे ‘मूलस्थान’ मानले जात असल्यामुळे या मंदिरामध्ये भाविकांची सतत मोठी गर्दी पहावास मिळते.

    याच ठिकाणी अनंतपद्मनाभस्वामी प्रथम अवतरल्याची आख्यायिका प्रसिद्ध असल्याने या मंदिराला मोठे महत्त्व आहे. या मंदिराची खासियत अशी, की या सरोवरामध्ये एक मगर असून, ही मगर गेली अनेक दशके या मंदिराचे रक्षण करीत असल्याची भाविकांची मान्यता आहे. या मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद या मगरीला खाऊ घातला जातो.

    या मगरीचे नाव बाबिया असून, ही मगर संपूर्ण शाकाहारी आहे. गेली अनेक दशके ही मगर याच सरोवरामध्ये असून, या सरोवरामध्ये आणखीही मगरी असण्याची शक्यता वर्तविली जात असते. मात्र, इथे एका वेळी एकच मगर दृष्टीस पडते. त्यामुळे बाकी मगरी येथे खरेच आहेत किंवा नाही याची पडताळणी अद्याप कोणी केलेली नाही.

    या मगरीच्या भोजनाची वेळही ठरलेली असून, भोजनाच्या ठरलेल्या वेळी ही मगर भोजनासाठी येते. मंदिरामध्ये दुपारच्या पूजेसाठी अर्पण केला जाणारा भात आणि गुळाचा प्रसाद बाबियालाही खाऊ घातला जातो. भाविक मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाबियाला पाहण्यासाठीही गर्दी करीत असतात.