Dabangs punished Dalit youth for love in Jabalpur

काळ कितीही बदलला तरी आजही जातीभेद, भेदभाव यासंदर्भातील घडना घडताना दिसून येतातच. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम केले म्हणून एका तरुणाला अघोरी शिक्षा केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने गावातील एका मुलीवर केले म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचे जबरदस्तीने मुंडण केले, गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये ही संतापजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

    जबलपूर : काळ कितीही बदलला तरी आजही जातीभेद, भेदभाव यासंदर्भातील घडना घडताना दिसून येतातच. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम केले म्हणून एका तरुणाला अघोरी शिक्षा केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने गावातील एका मुलीवर केले म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचे जबरदस्तीने मुंडण केले, गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये ही संतापजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

    पोलिसांकडे केली तक्रार

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील दमन खामरिया गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकुमार देहरिया या व्यक्तीने हे आरोप केले असून याबाबत तक्रार दाखल केली आहे. देहरिया याने आपल्या तक्रारीत आपले जबरदस्तीने मुंडण केले. साखळीने बांधले, गळ्यात चपलांचा हार घातला आणि संपूर्ण गावात फिरविले असल्याचे म्हटले आहे. गावातील एका मुलीवर प्रेम होते. तिच्याच घरच्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तसेच आरोपींनी या घटनेचा एक व्हीडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    मोबाईलमुळे घरच्यांना आला संशय

    तरुणाने तरुणीला एक मोबाईल गिफ्ट केला होता. मुलीकडे नवा फोन पाहिल्यावर तिच्या घरच्यांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी राजकुमार देहरियाला आपल्या घरी बोलाविले आणि त्याचे जबरदस्तीने मुंडण केले अशी माहिती देहरिया याने पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.