बापरे ! अयोध्येत शरयूच्या घाटावर स्नानासाठी उतरलेले एकाच कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील गुप्तार घाटावर १२ जण बुडाल्याची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळावर पोहोचून बचावकार्य करण्याचे आदेश दिले.

    आयोध्या: उत्तर प्रदेशमधील शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील १२ सदस्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अयोध्येमध्ये दर्शनासाठी आलेले पंरतु गुप्तार घाटावर स्नान करत अशताना ते शरयू नदीत अचानक बुडाले. बुडालेल्या लोकांमध्ये महिला आणि मुलाचा समावेश आहे. बुडालेल्यापैकी ३ जणांना वाचवण्यात नागरिकांनाच यश आले आहे . इतर मृत सदस्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे

    गुप्तार घाटाच्या शेवटच्या टोकावर एक कुटुंब स्नान करत होते. मात्र त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि ते नदीत वाहून गेले. लोकांच्या बुडण्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि पाणबुडे घटनास्थळावर बचावकार्य करत आहेत. दरम्यान, दुर्घटनेची सूचना मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळावर दाखल होत आहेत. दुर्घटनेची शिकार झालेले कुटुंबा आग्रा येथील सिकंदरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

    दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील गुप्तार घाटावर १२ जण बुडाल्याची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळावर पोहोचून बचावकार्य करण्याचे आदेश दिले.