मिशी ठेवल्यामुळे दलित तरुणाचं डोक फोडल; अहमदाबादमधील धक्कादायक प्रकार

एका 22 वर्षीय दलित तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदाबादच्या ग्रामीण भागात घडली आहे. पिळदार मिशी ठेवल्याने तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

    अहमदाबाद : एका 22 वर्षीय दलित तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदाबादच्या ग्रामीण भागात घडली आहे. पिळदार मिशी ठेवल्याने तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

    दलित तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत एकूण दहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापैकी 4 जण अज्ञात आहेत. टोळक्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर शिव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

    यानंतर विरामगाम ग्रामीण पोलिसांनी एफआयआर दाखल केला. सुरेश वाघेला असे पीडित तरुणाचे नाव असून तो कराकथल गावचा रहिवासी आहे. अहमदाबादमधील साणंद जीआयडीसीमधील व्होल्टास कंपनीत तो कार्यरत आहे.