A herd of monkeys took two 8-day-old twin sisters from inside the house in Tamil Nadu

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील गुर्जरबर्दिया गावच्या शाळेच्या आवारात महात्मा गांधींचा पुतळा क्षतिग्रस्त झाल्याची बातमी आली होती. या घटनेविषयी तपासणीनंतर पोलिसांनी शाळेच्या आवारात हजर असलेल्या माकडांनी गांधी पुतळ्याचे नुकसान केल्याचे सांगत या घटनेचे खापर माकडांवर फोडले.

    मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील गुर्जरबर्दिया गावच्या शाळेच्या आवारात महात्मा गांधींचा पुतळा क्षतिग्रस्त झाल्याची बातमी आली होती. या घटनेविषयी तपासणीनंतर पोलिसांनी शाळेच्या आवारात हजर असलेल्या माकडांनी गांधी पुतळ्याचे नुकसान केल्याचे सांगत या घटनेचे खापर माकडांवर फोडले.

    मंदसौरचे एसपी सिद्धार्थ चौधरी म्हणाले की, शाळेत कोणीही जाताना दिसले नाही. रात्री आठ वाजेपर्यंत शाळेचा सुरक्षा कर्मचारी ड्युटीवर होता. यापूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती, तेथे माकडांनी मूर्तीचा हात तोडला होता. त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. माकडांनी पुतळ्याचे नुकसान केले असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य मुद्यांचीही चौकशी केली जात आहे. अफजलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

    काँग्रेस नेते दीपकसिंग चौहान म्हणाले की, राष्ट्रपिताच्या पुतळ्याचे नुकसान करणे हा मोठा गुन्हा आहे. मंदसौर सपा म्हणत आहेत की, माकडांनी मूर्तीवर तोडफोड केली आहे. ते भाजपाच्या माकडांचा संदर्भ देत आहेत का?, असा सवालही चौहान यांनी केला.