RSS ला मिळाले नवे सरकार्यवाह, भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळेंची वर्णी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांनाच कायम ठेवलं जाणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याची उत्सुकता होती. त्यानुसार सध्या सहसरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दत्तात्रय होसबळे यांना सरकार्यवाहपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भैय्याजी जोशींकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असं संघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये झालेल्या सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नवा सरकार्यवाह मिळाला आहे.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांनाच कायम ठेवलं जाणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याची उत्सुकता होती. त्यानुसार सध्या सहसरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दत्तात्रय होसबळे यांना सरकार्यवाहपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भैय्याजी जोशींकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असं संघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सभा दर वर्षी होत असते. तर दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होत असतात. दर वर्षी नागपूरच्या संघ मुख्यालयात याचं आयोजन करण्यात येतं. मात्र यंदा नागपूरमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे यंदा ही बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालकांखालोखाल सरकार्यवाह हे दुसऱ्या नंबरचं महत्त्वाचं पद आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजप यांच्यात समन्वय ठेवण्याचं अत्यंत जिकीरीचं काम सरकार्यवाह पदावरील व्यक्तीला पार पाडावं लागतं. त्यादृष्टीनं सर्वसहमतीचा चेहरा म्हणून होसबळेंकडं पाहिलं जातंय. भैय्याजी जोशी यांनी दीर्घकाळ हे पद सांभाळलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे हे पद राहिल, अशी चर्चा होती. मात्र त्यांचं वाढतं वय आणि प्रकृतीचा विचार करत त्यांच्याकडून ही जबाबदारी तुलनेने तरुण खांद्यावर देण्याचा निर्णय संघानं घेतलाय.