ankita

अंकिताने आत्महत्या(suicide of ankita) करण्याआधी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तिने सासरच्या लोकांवर आणि पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत.  तिने हे सांगितले आहे की, आयुष माझ्याकडे पुन्हा येईल याची मी कधीपासून वाटत पाहत होते.

    उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार कौशल किशोर यांची सून अंकिता किशोरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.  अंकिताने आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घरासमोरच नस कापत असलेल्या अंकिताला पोलिसांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखलं केलं. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे अंकिताचा जीव वाचला आहे.

    आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी अंकिताने एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये अंकिताने पती आयुषवर गंभीर आरोप केले होते. आपली फसवणूक झाल्याचेही अंकिताने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

    अंकिता म्हणाली की, मी नस कापली तेव्हा नवरा आयुष आणि सासू अंगणामध्ये फेऱ्या मारत होते. कोणीही मला अडवलं नाही. दीड तासानंतर पोलीस तिथो पोहोचल्याचा आरोप अंकिताने केला आहे.

    अंकिताने आत्महत्या करण्याआधी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तिने सासरच्या लोकांवर आणि पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत.  तिने हे सांगितले आहे की, आयुष माझ्याकडे पुन्हा येईल याची मी कधीपासून वाटत पाहत होते. रविवारी आयुष माहिला कार्यालयामध्ये गेला होता. मी त्याला भेटण्यासाठी तिथे गेले तर पोलिसांनी तो आला नाहीय असं सांगून मला बाहेर काढलं. सर्वजणांचे एकमेकांशी साटंलोटं आहे. आयुष तिथेच आहे पण तो मला भेटला नाही,असं तिने सांगितलं.

    अंकिताने सांगितले की, आयुष मला सांगायचा की घरचे माझ्यावर प्रेम करत नाहीत. पण मी कायम त्याच्यासोबत राहिले. मात्र आयुषनं माझ्याकडून सारं काही हिरावून घेतलं. यामध्ये त्याचं काहीच नुकसान झालं नाही. तो घरच्यांकडे निघून गेला माझा विचार न करता. घराचं भाडं दिलेलं नाही. गॅसही संपला आहे. मी जेवले आहे की नाही याचीही आयुषने चौकशी केली नाही. मी आता खूप दूर चालले आहे. तुला हे कायम लक्षात राहील. चूक माझीच आहे की मी तुझ्यासोबत राहिले, असंही या व्हिडीओमध्ये अंकिताने म्हटलं आहे. आता माझ्या जगण्याचा काहीच अर्थ नसून कोणाच्याही प्रेमात पडू नका असे अंकिताने व्हिडिओमध्ये म्हटले.