UP-Hospital

उत्तर प्रदेशातील बहारिच जिल्ह्यातील(baharich hospital incident) सरकारी रुग्णालयातील एक प्रसंग पाहून सगळेच हळहळले.

    रुग्णालयात स्ट्रेचरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या आईला वाचवण्यासाठी तिच्या दोन्ही मुली(daughters tried to save mothers life by mouth to mouth resuscitation) तोंडाने श्वास देत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. उत्तर प्रदेशातील बहारिच जिल्ह्यातील(baharich hospital incident) सरकारी रुग्णालयातील हा प्रसंग पाहून सगळेच हळहळले.

    या घटनेचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ऑक्सिजन तसंच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची तक्रार ऐकू येत आहे.

    रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, महिलेला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली असता त्यांचा मृत्यू झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी शंभू कुमार आणि मेडिकल कॉलेजचे डॉक्टर महिला रुग्णापर्यंत पोहोचले आणि तपासणी केली.

    महाराज सुहेलदेव मेडिकल कॉलजचे मुख्याध्यापक ए के सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा रुग्णाला आपत्कालीन विभागात आणण्यात आलं तेव्हा कुटुंबाने त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला”.

    आईची स्थिती पाहून मुली भावूक झाल्या होत्या आणि त्यांनी तोंडाद्वारे श्वास देत वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या असंही त्यांनी सांगितलं.