बँकेत दिवसाढवळ्या दरोडा; चार मिनिटांत लुटले 1.19 कोटी!

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये गुरुवारी एका बँकेवर धाडसी दरोडा टाकण्यात आल. पाच दरोडेखोरांनी बँकेतून 1.19 कोटी रुपये पळवले. हाजीपूरच्या कर्णपुरा भागातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत सकाळी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेले पाच दरोडेखोर चार मिनिटात हा कारनामा करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाजीपूरमध्ये नाकाबंदी केली.

    हाजीपूर : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये गुरुवारी एका बँकेवर धाडसी दरोडा टाकण्यात आल. पाच दरोडेखोरांनी बँकेतून 1.19 कोटी रुपये पळवले. हाजीपूरच्या कर्णपुरा भागातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत सकाळी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेले पाच दरोडेखोर चार मिनिटात हा कारनामा करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाजीपूरमध्ये नाकाबंदी केली.

    केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या घराजवळच ही बँक आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बँक उघडताच दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला आणि हातातील शस्त्रांच्या आधारे कर्मचाऱ्यांना धमकावले. काही जणांनी सोबत आणलेल्या पोत्यांमध्ये पैसे भरण्यास सुरवात केली. चार मिनिटात 1 कोटी 19 लाख रुपयांची रोकड घेऊन फरार झाले.

    दरोडेखोर बाहेर पडताच बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर एसपी सहित पोलिसांची मोठी टीम बँकेच्या शाखेवर पोहोचली. आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला असून नाकाबंदीही करण्यात आली आहे.

    हे सुद्धा वाचा