कलम ३७० वर दिग्विजय सिंह यांच मोठं वक्तव्य, म्हणाले की…

काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयावरून त्यांनी वक्तव्य केलं आहे. दिग्विजय सिंह असे म्हणाले की, जेव्हा येथून कलम ३७० काढून टाकण्यात आला, तेव्हाच लोकशाहीचे मूल्य पाळली गेली नाहीत. यादरम्यान दोन्हापैकी एकाही मानवतेची मागणी ठेवली गेली नव्हती आणि त्यात कोणतेही काश्मीरीयन पण सहभागी नव्हते. ते सगळे कोठडीत बंद होते. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास आम्ही या निर्णयावर पुनर्विचार करू आणि कलम ३७० लागू करू. दरम्यान दिग्विजय सिंह देश-विदेशातील काही पत्रकारांशी बोलत होते.

    नवी दिल्ली : क्लबहाउस चॅटचा एक ऑडियो सोशल मीडिया व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयावरून त्यांनी वक्तव्य केलं आहे. दिग्विजय सिंह असे म्हणाले की, जेव्हा येथून कलम ३७० काढून टाकण्यात आला, तेव्हाच लोकशाहीचे मूल्य पाळली गेली नाहीत. यादरम्यान दोन्हापैकी एकाही मानवतेची मागणी ठेवली गेली नव्हती आणि त्यात कोणतेही काश्मीरीयन पण सहभागी नव्हते. ते सगळे कोठडीत बंद होते. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास आम्ही या निर्णयावर पुनर्विचार करू आणि कलम ३७० लागू करू. दरम्यान दिग्विजय सिंह देश-विदेशातील काही पत्रकारांशी बोलत होते.

    या दरम्यान, शाहजेब जिलानी यांनी कलम ३७० संबंधित काँग्रेस सरचिटणीसांना प्रश्न विचारला. जिलानी हा पाकिस्तानी पत्रकार असल्याचा दावा केला जात आहे. जिलानी यांनी विचारले होते की, सध्याचे सरकार निघून जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर भारताला दुसरे पंतप्रधान मिळतील तेव्हा काश्मीरबाबत पुढे जाण्याचा मार्ग काय असेल? मला माहित आहे की, आता भारतात काय घडत आहे त्या कारणास्तव ते दुर्लक्षित आहे. तथापि, हा एक मुद्दा आहे जो दीर्घकाळापर्यंत दोन्ही देशांमधील आहे.

    ट्विटर प्रोफाइलनुसार जिलानी बीबीसीचे माजी बातमीदार असून ते जर्मनीमध्ये राहते. त्यांनी पाकिस्तान, बेरुत, वॉशिंग्टन आणि लंडनमध्ये काम केले आहे. या अगोदर डीडब्लु न्यूजसाठी कार्यरत आहेत आणि त्यांचा जन्म पाकिस्तानमधील सिंध येते झाला आहे. जिलानी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले की,” मला वाटते की समाजासाठी जे धोकादायक आहे ते म्हणजे धार्मिक कट्टरतावाद. मग तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख यांच्याशी संबंधित का असेना, धार्मिक कट्टरतावाद देशास कारणीभूत ठरतो. आणि द्वेषामुळे हिंसा होते. ते म्हणाले की ” प्रत्येक समाज आणि धार्मिक समुदायाला हे समजेल पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची परंपरा आणि श्रद्धा, भावना किंवा धर्म लादण्याचा कोणालाही अधिकार नाही

    काँग्रेस नेते म्हणाले की मुस्लिम बहुल राज्यात एक हिंदू राजा होता. दोघांनी एकत्र काम केले वास्तविक काश्मीरमधील सरकारी सेवेत काश्मिरी पंडितांना आरक्षण देण्यात आले होते. म्हणून कलम ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीरचे राज्य कमी करणे हा अत्यंत दुःखद निर्णय आहे. आम्हाला या समस्येवर पुन्हा विचार करावा लागेल.

    ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलम ३७० रद्द केला. सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवले होते. जम्मू-काश्मीर मधील २० आणि लडाखमधील लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे