…तेव्हा महाराज होते, आता भाई साहेब बनवले; दिग्विजय सिंह यांची भाजपच्या ‘या’ नेत्यावर टीका

राज्यसभेत ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत होते, तेव्हा मला वाईट वाटले. ज्यावेळी माझी संधी आली, तेव्हा मी म्हणालो- महाराज जय हो...तुम्ही आधी एक चांगल्या पद्धतीने काँग्रेसला समर्थन देते होते. तितकेच आता तुम्ही भाजपासाठी करत आहात, असे दिग्विजयसिंह यांनी सांगितले.

    भिंड : राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी भाजपा राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने इतकी वर्षे ज्यांना महाराज म्हणून मान दिला होता, त्यांना भाजपाने एका वर्षात भाई साहेब बनवले, असा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

    राज्यसभेत ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत होते, तेव्हा मला वाईट वाटले. ज्यावेळी माझी संधी आली, तेव्हा मी म्हणालो- महाराज जय हो…तुम्ही आधी एक चांगल्या पद्धतीने काँग्रेसला समर्थन देते होते. तितकेच आता तुम्ही भाजपासाठी करत आहात, असे दिग्विजयसिंह यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री व लहारचे आमदार डॉ गोविंद सिंह, गोहदचे आमदार मेवाराम जाटव व अन्य काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

    गोहदमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. यावरून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. गोहद येथील बेसली धरणातील पाणी पूर्णपणे कोरडे पडले आहे. यामुळे जनतेला पिण्याच्या पाण्याची चिंता करावी लागत आहे. काँग्रेसकडून बेसली धरण भरण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी दिग्विजय सिंह गोहद येथील या आंदोलनात सामील झाले होते.