Direct view of the Himalayas from Uttar Pradesh; Lockdown reduces pollution

प्रदूषणात कमालीची घट झाल्याने आता दृश्यमानता वाढली आहे. यामुळेच की काय, उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून थेट हिमालयाची शिखरे दिसू लागली आहेत. उत्तर प्रदेशातून थेट हिमालयाचे दर्शन होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच इतक्या लांबून घेतलेले हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    लखनौ : लॉकडाऊनमुळे प्रदूषणात घट झाली आहे. यामुळे उत्तरप्रदेशातून थेट हिमालयाचे दर्शन होत आहे. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक व्यवस्था बंद आहेत. यामुळे गेल्या काही दिवसात प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हवेत उडणारे सुक्ष्म कण नष्ट झाले आहेत.