आपण मृत्यूलोकमध्ये राहतोय: मास्क वापरण्याऐवजी… कोरोनाबाबत सांस्कृतिक मंत्र्यांचे दिव्यज्ञान ऐकून थक्क व्हाल

उशा ठाकूर स्वतःदेखील मास्क वापरत नाहीत. ठाकूर म्हणाल्या, की राज्य सरकारकडे कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी साधने आहेत. त्यामुळे, काळजी करण्याची गरज नाही. लोकांना काही अडचणी येत आहेत, त्यादेखील सोडवल्या जातील. उषा ठाकूर स्वतः असे मानतात की नियमित यज्ञ आणि अग्निहोत्र केल्यास कोरोनापासून बचाव शक्य आहे.

    भोपाळ : मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोनाशी लढण्याचा नवा उपाय सांगितला आहे. मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या उपायांनी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला त्यांनी सगळ्यांना दिला आहे. त्या इंदोरमध्ये कोरोनासंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होत्या. मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी

    आपण मृत्यूलोकमध्ये राहत आहोत. याठिकाणी जीवन-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेले आहे. त्यामुळे कोरोनाला उगाच घाबरून मास्क वगैरे वापरण्याची गरज नसल्याचेही असेही उषा यावेळी म्हणाल्या.