दोघात तिसरा आता सगळं विसरा… खरा मालक शोधण्यासाठी म्हशीची घेतली DNA टेस्ट

एका म्हशीच्या दोन मालकांमधील वाद सोडवण्यासाठी त्या वादग्रस्त म्हशीचीच DNA टेस्ट घेण्यात आली आहे. म्हशीची DNA टेस्ट घेणं बुआ हा जणू विचित्र प्रकार दिसल्यासारखं वाटतयं. परंतु या मागील खरं कारण काय ते आपण पाहू!

नागौर : एखाद्या मुलाची ओळख सिद्ध करण्यासाठी त्याच्या आईवडिलांची टेस्ट केली जाते. हे प्रकरण किंवा या गोष्टी आतापर्यंत आपण ऐकल्या आहेत. परंतु खरा मालक शोधण्यासाठी चक्क… म्हशीची DNA टेस्ट घेण्यात आली आहे. बहुधा हा चित्रविचित्र प्रकार असावा.

राजस्थानमध्ये (Rajsthan) देखील एका अशाच वादामध्ये DNA टेस्ट घेतली गेली. एका म्हशीच्या दोन मालकांमधील वाद सोडवण्यासाठी त्या वादग्रस्त म्हशीचीच DNA टेस्ट घेण्यात आली आहे. म्हशीची DNA टेस्ट घेणं बुआ हा जणू विचित्र प्रकार दिसल्यासारखं वाटतयं. परंतु या मागील खरं कारण काय ते आपण पाहू!

काय आहे प्रकरण?

नागौर जिल्ह्यातील पुसाराम मेघवाल हा व्यक्ती रेखाराम जाट यांच्याकडे कामाला आहे. २४ ऑगस्ट २०२० ला पुसारामने एका शेतामध्ये तीन वर्षांच्या एका म्हशीला चारा खाण्यासाठी सोडलं. परंतु म्हैस संध्याकाळी घरी न परतल्याने पुसारामने म्हशीचा शोध घेतला. त्यावेळी त्याला ती म्हैस एका ठिकाणी चारा खाताना दिसली. त्यानंतर पुसाराम म्हशीला घरी घेऊन जात असताना त्याला केशाराम जाट यांनी रोखले. परंतु ज्या दिवशी पुसारामला केशाराम यांनी रोखले त्या दिवसापासून म्हशीच्या मालकी हक्काचा वाद सुरू झाला आहे.

आमच्या म्हशीला जाट परिवाराने जबरदस्तीने जप्त केले आहे, अशी तक्रार पुसारामचे वडील हिम्मतराम यांनी पोलिसांकडे केली. या प्रकरणात जाट परिवाराने काही माणसांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोपही हिम्मतरामने केला आहे. जाट परिवाराने मात्र ती म्हैस आपल्याच मालकीची असल्याचा दावा केला आहे. परंतु पोलिसांनी दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा तीनदा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे म्हशीची DNA टेस्ट घेण्यात आली असून म्हशीचा खरा मालक कोण ? हे DNA टेस्ट नंतरच समोर येणार आहे.