Do you have a girlfriend During the program, the girl directly asked Rahul Gandhi a question

राहुल गांधी यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, अद्याप त्यांनी लग्न केलेलं नाही. राहुल गांधी यांना अनेकदा विरोधकांकडून सोशल मीडियावर लग्न या विषयावरुन ट्रोल केलं जातं. राहुल गांधी यांची प्रेयसी आहे का यासंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसून खुद्द राहुल गांधींनीही कधी यासंदर्भात उघडपणे खुलासा किंवा वक्तव्य केलेलं नाही. यामुळे त्यांच्या या पर्सनल लाईफ बद्दल नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते.

    पुद्दुचेरी : भर कार्यक्रमात एका मुलीने विचारलेल्या प्रश्नामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच गोंधळून गेले. मुलीने प्रश्नच असा विचारला की, काय उत्तर द्यावे हेच राहुल गांधींना कळाले नाही. त्यांनी बोलता बोलता या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.

    पुद्दुचेरीमधील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेहमी सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी या कार्यक्रमात निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये आले होते.

    या कार्यक्रमामध्ये मुलांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले. याचदरम्यान एका मुलीने “तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?,” असा प्रश्न राहुल गांधींना विचारला. या मुलीने विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राहुल यांनी या प्रश्नाला हसून उत्तर देताना, “या प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या दिवशी देईन,” असं म्हटलं. या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.