फक्त २५ रुपयांत डॉक्टर करतात हजारोंची कमाई; बनावट इंजेक्शनची ३० ते ३५ हजारात विक्री

मध्यप्रदेशातील रतलाममध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एक तरुण परिचारिका असलेल्या बहिणीसोबत संगनमत करून हे रॅकेट चालिवत असे. त्याची बहिण मेडिकल कॉलेजमधून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या द्यायची. भाऊ त्यात सामान्य अँटीबायोटिक सेफ्ट्रिक्सोन पाउडर टाकून विकत असे.

    रतलाम : मध्यप्रदेशातील रतलाममध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एक तरुण परिचारिका असलेल्या बहिणीसोबत संगनमत करून हे रॅकेट चालिवत असे. त्याची बहिण मेडिकल कॉलेजमधून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या द्यायची. भाऊ त्यात सामान्य अँटीबायोटिक सेफ्ट्रिक्सोन पाउडर टाकून विकत असे.

    हे इंजेक्शन दलालांना ६ ते ८ हजार रुपयांना तर दलाल हे बनावटी इंजेक्शन ग्राहकांना/रुग्णांना ३० ते ३५ हजार रुपयांना विकायचे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात रतलामच्या जीवांश हॉस्पिटलचे डॉक्टर उत्सव नायक, डॉक्टर यशपाल सिंह, मेडिकल व्यवसायी प्रणव जोशी, मेडिकल कॉलेजची नर्स रीना प्रजापती, रीनाचा भाऊ पंकज प्रजापती, जिल्हा रुग्णालयात पावती बनवणारा गोपाल मालवीय आणि रोहित मालवीय यांचा समावेश आहे.

    मेडिकल कॉलेजमध्ये बनावट इंजेक्शनची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जीवांश हॉस्टिपलमध्ये सापळा रचला. पोलिसांनी ड्यूटीवर असलेल्या दोन डॉक्टरांना ३० हजार घेऊन इंजेक्शन देत अताना रंगेगात पकडले. यावेळी पोलिसांनी डॉक्टर उत्सव नायक आणि डॉक्टर यशपाल सिंहला अटक केली. चौकशीत झालेल्या खुलाशात फरार आरोपी प्रणव जोशीला मंदसौरमधून अटक केले. यानंतर मेडिकल कॉलेजची परिचारिका रिना प्रजापती, तिचा भाऊ पंकज प्रजापती, गोपाल मालवीय आणि रोहित मालवीयच्या नावांचा खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी या चौघांना अटक केली.