doctors photo with and without ppe kit

सोशल मीडियावर एका डॉक्टरचा फोटो व्हायरल(doctors photo without ppe kit viral on social media) झाला आहे. ज्यामध्ये ते पीपीई किट काढल्यानंतर कपडे घामाने भिजलेले, अशा परिस्थितीत दिसत आहे.

    देशात कोरोनाचे थैमान सुरु आहे. डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ रुग्णालयात दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी झटत आहेत.  अशातच सोशल मीडियावर एका डॉक्टरचा फोटो व्हायरल(doctors photo without ppe kit viral on social media) झाला आहे. ज्यामध्ये ते पीपीई किट काढल्यानंतर कपडे घामाने भिजलेले, अशा परिस्थितीत दिसत आहे.


    हा फोटो डॉक्टर सोहेलने बुधवारी ट्विटरवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, अभिमान आहे की देशासाठी काहीतरी करत आहे. यामध्ये डॉक्टर सोहेल यांनी पीपीई किट घातलेला एक फोटो आहे. तर दुसरा फोटो पीपीई किट काढल्यानंतरचा आहे. यात त्यांचे कपडे कामाने भिजलेले असल्याचं दिसत आहे.

    त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मला सांगायचं आहे की, आम्ही आमच्या कुटुंबापासून लांह राहून खूप मेहनत करीत आहे. कधी कधी पॉझिटिव्ह रुग्णापासून एक पाऊल दूर, तर गंभीर आजारी असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून १ इंचापासून लांब असतो. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया लसीकरण करून घ्यावे. सध्या हा एकमेव उपाय आहे. सुरक्षित राहा. अनेकांनी त्यांचं हे ट्विट शेअर केलं आहे. डॉक्टरांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.