डॉक्टरच औषधे-इंजेक्शनची करतात चोरी; राज्यपालांचे वादग्रस्त विधान

कोरोना महामारीच्या काळात नकली इंजेक्शन आणि औषधांची विक्री करण्यात आली, ऑक्सिजनचीही चोरी झाली. हे सर्व अशिक्षित शेतकरी किंवा मजुरांनी नाही तर उच्चशिक्षित डॉक्टर-इंजिनीअर आणि पदवीधारकांनी केले, असे विधान राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

    अहमदाबाद : ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिन’ निमित्ताने कोरोना महामारीच्या काळात नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहे. एकीकडे डॉक्टरांचे कौतुक होत असताना गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी डॉक्टरांवर चोरीचा आरोप केला आहे.

    कोरोना महामारीच्या काळात नकली इंजेक्शन आणि औषधांची विक्री करण्यात आली, ऑक्सिजनचीही चोरी झाली. हे सर्व अशिक्षित शेतकरी किंवा मजुरांनी नाही तर उच्चशिक्षित डॉक्टर-इंजिनीअर आणि पदवीधारकांनी केले, असे विधान राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

    तसेच पाप, बेईमानी, भ्रष्टाचार हे सर्व शिक्षित लोकांद्वारे केले जाते, असे असेल तर मग या लोकांच्या शिक्षित होण्याचा आणि पदवीधारक होण्याला काय अर्थ आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.