लस घेतल्यानंतर 500 रुपयांची मदत करा; भाजपाच्या मंत्र्यांचे अजब आवाहन

मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा नेत्या उषा ठाकूर यांनी जनतेला एक वेगळेच आवाहन केले आहे. कोरोनाविरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधाननिधीमध्ये प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी, असे आवाहन उषा ठाकूर यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना आवाहन करते की कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्यांनी पंतप्रधान मदतनिधीत प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी.

    भोपाळ : मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा नेत्या उषा ठाकूर यांनी जनतेला एक वेगळेच आवाहन केले आहे. कोरोनाविरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधाननिधीमध्ये प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी, असे आवाहन उषा ठाकूर यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना आवाहन करते की कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्यांनी पंतप्रधान मदतनिधीत प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी.

    आपल्याला माहीतच आहे की एका डोसची किंमत 250 रुपये आहे. जर आपल्याला सरकारकडून कोरोनाचे दोन्ही डोस मोफत मिळत असतील तर ज्यांना शक्य आहे त्यांनी 500 रुपये मदतनिधी म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. ही माझी विनंती आहे, असे उषा ठाकूर म्हणाल्या.

    संपूर्ण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असेही त्या म्हणाल्या.