मी पण हिंदूच आहे, मला हिंदुत्व शिकवू नका, ममता बॅनर्जींची भाजपवर आगपाखड

मी स्वतः एक हिंदु मुलगी आहे. मला भाजपने हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराच ममता बॅनर्जींनी भाजपला दिला. नंदीग्राममध्ये सभेत बोलताना ममता बॅनर्जींनी थेट काही मंत्रांचेच उच्चारण केले. मी घराबाहेर पडण्यापूर्वी दररोज चंडीपाठ म्हणते. चंडीपाठातील श्लोकांचं पठण करते. मी एक हिंदु मुलगी असून भाजपने मला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली. 

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची प्रचार सध्या रंगात आलाय. मुख्यमत्री ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी मुख्य लढत पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदीग्राममध्ये घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार आगपाखड केली.

    मी स्वतः एक हिंदु मुलगी आहे. मला भाजपने हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराच ममता बॅनर्जींनी भाजपला दिला. नंदीग्राममध्ये सभेत बोलताना ममता बॅनर्जींनी थेट काही मंत्रांचेच उच्चारण केले. मी घराबाहेर पडण्यापूर्वी दररोज चंडीपाठ म्हणते. चंडीपाठातील श्लोकांचं पठण करते. मी एक हिंदु मुलगी असून भाजपने मला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली.

    ममता बॅनर्जींच्या दहा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी सध्या भाजपनं केलीय. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा भाजपनं लावून धरलाय. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी भडकल्या होत्या. त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे ममता बॅनर्जींना राग येण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करत भाजपने हिंदुत्ववादाचा मुद्दा आणला होता. त्याला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जींनी मंत्रोच्चारण करून आपण हिंदु असल्याचं आणि हिंदुत्वला आपला विरोध नसल्याचंच दाखवून दिलंय.

    नुकत्याच जाहीर झालेल्या टाईम्स नाऊ-सीव्होटरच्या जनमत चाचणीनुुसार सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचंच पारडं जड असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. मात्र आता कुठे प्रचाराला खरी सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा पश्चिम बंगालमध्ये होणार आहेत. पंतप्रधानांना बांग्लादेश दौराही या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. यापुढे प्रचारादरम्यान बंगालचं वातावरण कसकसं बदलत जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.