पॅनकार्ड हरवलंय चिंता करु नका, नव्या आयकर पोर्टलवरून त्वरित उपलब्ध होईल ई-पॅन : जाणून घ्या प्रोसेस

पॅन कार्ड एक आवश्यक केवायसी दस्तऐवज आहे. यासह प्राप्तिकर परतावा म्हणजे आयटीआयसाठीही हे अत्यंत महत्वाचं आहे. मात्र, ते कुठे हरवलं किंवा चोरी झाली किंवा आपण ते कुठेतरी ठेवून विसरून गेलो, तर कामं अडून राहतात. परंतु, आता आपल्याला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण आता प्राप्तिकर विभागाच्या नवीन प्राप्तिकर पोर्टल incometax.gov.in वरून आपलं ई-पॅन कार्ड त्वरित डाउनलोड करणं शक्य आहे.

    नवी दिल्ली : पॅन कार्ड एक आवश्यक केवायसी दस्तऐवज आहे. यासह प्राप्तिकर परतावा म्हणजे आयटीआयसाठीही हे अत्यंत महत्वाचं आहे. याशिवाय बँक खातं उघडण्यासाठी किंवा नवीन क्रेडिट व डेबिट कार्ड इत्यादींसाठीही याची आवश्यकता आहे.

    मात्र, ते कुठे हरवलं किंवा चोरी झाली किंवा आपण ते कुठेतरी ठेवून विसरून गेलो, तर कामं अडून राहतात. परंतु, आता आपल्याला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण आता प्राप्तिकर विभागाच्या नवीन प्राप्तिकर पोर्टल incometax.gov.in वरून आपलं ई-पॅन कार्ड त्वरित डाउनलोड करणं शक्य आहे.

    …तरीही ई-पॅन कार्ड काढणे शक्य

    पॅन कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यावर त्याचा नंबर आठवत नसेल तर ई-पॅन कार्ड पॅन नंबरशिवाय डाउनलोड करावे लागेल. यासाठी, आपलं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे. अन्यथा, ई-पॅन कार्ड काढता येणार नाही.

    कसं काढायचं ई-पॅनकार्ड?

    ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या नव्या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. येथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ‘Our Services’ म्हणजेच ‘आमच्या सेवा’ विभागात जावे लागेल. यात डाव्या बाजूला तुम्हाला ‘इन्स्टंट ई पॅन’ ‘Instant E PAN’ दिसेल. आपण त्यावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला काही सोप्या स्टेप्समध्ये आपलं ई-पॅन कार्ड डाउनलोड करता येईल.