श्रीनगरमध्येही ड्रोनवर बंदी

आदेशानुसार, कोणत्याही प्रकारचा ड्रोन अथवा मानवरहित उपकरण बाळगण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे असा वस्तू असतील त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात या वस्तू जमा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मोहंमद एजाज यांनी केले आहे. महत्त्वपूर्ण संस्थांची सुरक्षा लक्षात घेता कठुआच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश देत ड्रोनच्या वापराचा नियंत्रित घडामोडींमध्ये समावेश केला आहे.

    श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कठुआ, राजौरी पाठोपाठ आता श्रीनगरातही प्रशासनाने ड्रोन आणि उडत्या वस्तूंच्या वापरावर बंदी घातली आहे. रविवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वायुदल परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर श्रीनगरात उडत्या वस्तूंवरील उपयोगावर तत्काळ बंदी घालण्यात आली असल्याचे नमूद केले आहे.

    आदेशानुसार, कोणत्याही प्रकारचा ड्रोन अथवा मानवरहित उपकरण बाळगण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे असा वस्तू असतील त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात या वस्तू जमा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मोहंमद एजाज यांनी केले आहे. महत्त्वपूर्ण संस्थांची सुरक्षा लक्षात घेता कठुआच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश देत ड्रोनच्या वापराचा नियंत्रित घडामोडींमध्ये समावेश केला आहे.

    या आदेशांनुसार, कठुआ जिल्ह्यात ड्रोन ऑपरेशनसाठी आता एसीआर किंवा एसडीएमची परवानगी घेणे अनिवार्य असेल. ज्याद्वारे विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येईल तसेच याचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवले जाईल.