स्वप्नातील घर बांधणीसाठी साठविलेल्या ५ लाख रुपयांचा वाळवीने केला चुराडा; कुटुंबियांना दुःखाश्रू अनावर

पै पै पैसा गोळा करून घर उभारले जाते. ही म्हण आपण ऐकलेली आहे. मात्र, घरबांधणीसाठी साठवलेल्या पैशाला वाळवी लागली तर घराच्या स्वप्नांचा चुराडा होतो. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मइलावरम गावात अलीकडे अशीच एक घडना घडली. ज्यामध्ये वाळवीने पेटीत ठेवलेल्या नोटांचा अक्षरक्षः भूगा पाडला.

  कृष्णा (krushna).  पै पै पैसा गोळा करून घर उभारले जाते. ही म्हण आपण ऐकलेली आहे. मात्र, घरबांधणीसाठी साठवलेल्या पैशाला वाळवी लागली तर घराच्या स्वप्नांचा चुराडा होतो. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मइलावरम गावात अलीकडे अशीच एक घडना घडली. ज्यामध्ये वाळवीने पेटीत ठेवलेल्या नोटांचा अक्षरक्षः भूगा पाडला. हे दृष्य पाहून कुटुंबातील सदस्यांना दुःखाश्रू अनावर झाले.
  ही रक्कम घरातीलच एका लोखंडी पेटीत प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये गुंडाळून ठेवली होती.

  गेल्या काही काळापासून त्याने या पैशाकडे लक्ष दिलं नव्हतं. पण गेल्या आठवड्यात एका व्यक्तीची उधारी देण्यासाठी जेव्हा ही पेटी उघडली, तेव्हा आतील दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोकाचं चुकला आहे. कारण त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची आयुष्यभराची कमाईला वाळवी (Termites) लागली होती. पेटीत ठेवलेल्या सर्व नोटा वाळवीने कुरतडल्या (Termites eats all saved money) होत्या. हे दृश्य पाहून कुटुंबियातील सदस्याना अश्रू अनावर झाले. गेल्या काही वर्षांपासून नवीन घराचं पाहिलेलं स्वप्न एका क्षणात धुळीस मिळालं.

  मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मइलावरममध्ये राहणाऱ्या जमालया नावाच्या व्यक्तीची आहे. तो एका मटन शॉपमध्ये मांस विक्रीचं काम करतो. त्याने गेल्या काही वर्षांपासून पै पै जोडायला सुरुवात केली होती. त्याला या पैशातून स्वत: साठी आणि कुटुंबियासाठी घर बांधायचं होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याने हे पैशे उघडून पाहिलेचं नाहीत.

  पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 2020 साली या भागात बराच पाऊस झाला होता. अशा मोसमात वाळवी लागण्याची शक्यता जास्त असते. जमालयाच्या बाबतीतही हेच घडलं आहे. त्याच्या घरी ठेवलेल्या लोंखडी पेटीत ठेवलेल्या पैशांना वाळवी लागली आहे. वाळवीने सर्व नोटा खराब केल्या आहेत. जमालयची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची आहे. गेल्या आठवड्यात त्याने एका व्यक्तीची उधारी देण्यासाठी ही पेटी उघडली तेव्हा त्याच्या स्वप्नाचा भंग झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.

  त्याने पेटी उघडताच त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा काळजाचा ठोकाच चुकला आहे झाला. वाळवीने सर्व नोटा खाल्या होत्या. या पेटीत एकूण पाच लाख एवढी रक्कम होती, ज्यामध्ये 500, 200, 100, 20 आणि अगदी 10 रुपयांच्या नोटांचा देखील समावेश होता. यानंतर जमालयाची अवस्था पाहून बँक ऑफ बडोदाचे अधिकारी मदतीसाठे पुढे सरसावले आहेत. त्यांनी या पैशांचा पंचनामा करून हे सर्व रुपये रिझर्व्ह बँकेला पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतरच जमालयाला मदत मिळते की नाही ते सांगता येईल.