शवविच्छेदन अहवालात  झाला बदल ; मुस्लिम युवकाच्या शवावर हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार

पोलिसांनी जेव्हा तनवीरच्या घराच्या आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेज संभालळी तेव्हा बेपत्ता झाल्याच्या दिवशी तो मित्र इमरान व आसिफ बरोबर जाताना दिसला. यातून इमरान व आसिफ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आम्हीच तनवीरचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

मुरादाबाद: शवविच्छेदानातील अहवालात बदल झाल्याने मुस्लिम युवकाच्या शवाचे हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार पारपडेल्याची घटना घडली आहे. सर्वात आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे मृत युवकांच्या कुटुंबीयांनी ही मुस्लिम युवकाचा मृत देह म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच आपला मुलगा बेपत्ता झाला असून त्याचा शोध कुटुंबीय घेत होते. ऑगस्ट २०१९ मध्ये मुगलपुरा परिसरात घुइयां बाग येथील निवासी असलेला तनवीर
अहमद ई -रिक्षा चालवण्याचे काम करत होता. मात्र १ऑगस्ट ला घरा बाहेर पडलेला तन्वीर घरीच परत आलाच नाही. तनवीरच्या नातेवाईकांनी त्याचा खूप शोध घेटाकळीतला परंतु त्याचा शोध लागला नाही. परंतु त्याच्या रिक्षामध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला परंतु तो इसमस तनवीर नसल्याचे नातेवाईकांनी ओळखलेच नाही. दरम्यान तनवीरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले मृतदेह हिंदू युवकाचा असल्याची शंका व्यक्त करण्यात आली .

मित्रांनीच केला घात

तनवीर सापडत नसल्यामुळे कुटुंबीय सातत्याने त्याचा शोध घेत होती. पोलीस स्थानकातही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा तनवीरच्या घराच्या आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेज संभालळी तेव्हा बेपत्ता झाल्याच्या दिवशी तो मित्र इमरान व आसिफ बरोबर जाताना दिसला. यातून इमरान व आसिफ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आम्हीच तनवीरचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच मृतदेहाची ओळखपटू नये, यासाठी चेहऱ्यावर ऍसिड टाकून चेहरा विद्रुप केल्याचे त्याची माहितीत्यांनी पोलिसांना दिली.आणि हत्या झाल्याचे उघड झाले. दोन्ही आरोपीनवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान ताणावीरच्या आईची व भावाची डीएनए तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत जळालेला मृतदेह हा तनवीरचाच असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी शक्ती सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात आला होता.