ही तर कमालच झाली – त्या शिक्षकाचं दहा वर्षांचं दुखणं कोरोनावरच्या लसीमुळे पळालं दूर?

मध्य प्रदेशमधील एका शिक्षकाने(teacher cured from 10 year old disease) कोरोना लस घेतल्यानंतर आपल्याला दहा वर्षांपासून असलेल्या समस्येतून मुक्तता झाल्याचे म्हटले आहे.

    भोपाळ: कोरोनाची लस(Corona Vaccine) घेतल्यामुळे अनेकांचे कोरोनापासून संरक्षण झाले आहे. कोरोनापासून बचावासाठी घेण्यात आलेल्या लशीमुळे दहा वर्षांपासून असलेला आजार गायब झाला, असा दावा एका व्यक्तीने केला आहे. मध्य प्रदेशमधील एका शिक्षकाने(teacher cured from 10 year old disease) कोरोना लस घेतल्यानंतर आपल्याला दहा वर्षांपासून असलेल्या समस्येतून मुक्तता झाल्याचे म्हटले आहे.

    बडवानीतल्या भंवरगढच्या माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले काशीराम कनोजे यांच्या गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या पायांच्या तळव्यांना खाज येत होती. जळजळ होत होती. यामुळे त्यांना उठणं, बसणं, झोपणंही अशक्य झालं होतं. जमिनीवर ते पाय टेकवूच शकत नव्हते. शाळेतही ते खुर्चीवर पाय ठेवून बसायचे. दहा वर्षांत त्यांनी या समस्येतून सुटका होणयासाठी खूप प्रयत्न केले पण समस्या संपली नाही.

    जामानिया उपआरोग्य केंद्रात ११ एप्रिलला काशीराम यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. त्याच्या पाच दिवसांनंतर त्याच्या पायांच्या तळव्यातील जळजळ कमी होऊ लागली आणि हळूहळू पूर्णपणे आराम मिळाला. कोरोनावरची लस घेतल्यानंतर ५ दिवसांमध्ये त्यांच १० वर्ष दुखण दूर पळाले.