बेळगावच्या सभेत अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल ; मोदी सरकारच्या कामांचे दिले दाखले

गरीब हटाओचा नारा देत, काँग्रेसच्या चार पिढ्यांनी देशावर राज्य केले, मग गरिबांच्या घरात गॅस कनेक्शन का पोहोचले नाही, शौचालय गरीबांच्या घरात का पोहोचले नाही, गरिबांच्या घरात वीज पोहोचली नाही, गरिबांना घर का मिळाले नाहीत? असा खोचक प्रश्नही शहांनी कॉंग्रेसला विचारला.

बेळगाव: काँग्रेसला गरीबीपेक्षा गरीबांना हटवायचे होते. पंतप्रधान मोदींनी गरिबांसाठी बँक खाती उघडली, पैसे थेट त्यांच्या खात्यात पाठवले. १३ कोटी गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले आणि देशातील प्रत्येक नागरिकास घरे देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक मधील बेळगावच्या सभेत दिला.  “गरीब हटाओचा नारा देत, काँग्रेसच्या चार पिढ्यांनी देशावर राज्य केले, मग गरिबांच्या घरात गॅस कनेक्शन का पोहोचले नाही, शौचालय गरीबांच्या घरात का पोहोचले नाही, गरिबांच्या घरात वीज पोहोचली नाही, गरिबांना घर का मिळाले नाहीत? हा खोचक प्रश्नहीशहांनी कॉंग्रेस नेत्यांना विचारला

मोदी सरकारने केलेल्या कामाचा आढावा त्यांनी सभेत घेतला. आमच्या सरकारने मुस्लिम महिलांचा सन्मान केला. मुस्लिम बहिणींना ट्रिपल तलाकपासून मुक्त करण्याचे काम केले. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम केले. पाकिस्तानच्या घरात प्रवेश करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचेही ते म्हणाले. “पंतप्रधानानी आता ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली आहे. भरतातील १३० कोटी जनतेचे भारतातच तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करण्यास सुरुवात केली , तर जगातील सर्वाधिक अव्वल दर्जाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक आपोआपवरती येईल असेही ते म्हणाले.