उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

उत्तराखंडमधील हरिद्वार आणि परिसरात सकाळच्या सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. सौम्य स्वरूपाचा हा भूकंप असला तरी त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. ३.९ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात कुठलंही नुकसान झाल्याची माहिती नाही. कुठलीही जीवित किंवा वित्तहानीची घटना अद्याप नोंदवण्यात आलेली नाही.

उत्तराखंड राज्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळते आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वार आणि परिसरात सकाळच्या सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. सौम्य स्वरूपाचा हा भूकंप असला तरी त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. ३.९ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.

सकाळच्या वेळी नागरिकांना अचानकपणे भूकंपाचे हादरे जाणवू लागल्यानंतर नागरिक घराबाहेर आले. मात्र अनेक ठिकाणी हे धक्के सौम्य असल्यामुळे नागरिकांना भूकंपाची जाणीवदेखील झाली नाही. मात्र काही वेळातच ही बाब वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी एकमेकांना फोन करून ही बाब कळवायला सुरुवात केली.

या भूकंपात कुठलंही नुकसान झाल्याची माहिती नाही. कुठलीही जीवित किंवा वित्तहानीची घटना अद्याप नोंदवण्यात आलेली नाही. नागरिकांनी सतर्क राहावं आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय.