उत्तराखंडला भूकंपाचा धक्का; 3.4 रिश्टर स्केल तीव्रता

    डेहराडून : उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी येथून 23 किलोमीटर अंतरावर शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीए) माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल एवढी नोंदविली गेली. भूकंपात जीवित अथवा वित्तीय हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    उत्तराखंडला 23 मे रोजी रात्री 12 वाजतानंतर चामोली, उत्तरकाशी आणि डेहराडून जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचे 4.3 रिश्टर स्केल नोंदविली गेली. भूकंपाचे केंद्र जोशीमठपासून 43 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाच्या धक्क्याने घरांमधून लोक बाहेर पडले. मसूरी येथील भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरांमधील वस्तू हलत असल्याचे नागरिकांना दिसले होते.

    दरम्यान, राजस्थानच्या बिकानेरमध्ये भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 नोंदविली गेली. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाले नाही.