जम्मू-कश्मीरमध्ये भूंकपाचे धक्के; रिक्टर स्केलवर ४.३ तीव्रतेची नोंद, भूंकपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानात…

जम्मू काश्मीरच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच रिक्टर स्केलवर या भूंकपाची तीव्रता ४.३ असल्याची नोंद करण्यात आली आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून जम्मू काश्मीर आणि उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज शनिवारी दुपारी १०.१४ मिनिटांनी जम्मू काश्मीरच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच रिक्टर स्केलवर या भूंकपाची तीव्रता ४.३ असल्याची नोंद करण्यात आली आहे. या भूंकपामुळे कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. परंतु या भूंकपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानात असल्याची माहिती मिळाली आहे.