जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आलंय. स्वतः फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्याशी संबंधित इतरांची ११.८६ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलीय. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ११.८६ कोटी असली तरी तिचं सध्याचं बाजारमूल्य हे ६० ते ७० कोटी रुपये असल्याचंही सांगण्यात येतंय.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरू आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) गैरव्यवहार प्रकरणात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप फारुख अब्दुलांवर आहे. या प्रकरणी तपास करताना वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ११ कोटी ८६ लाख रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत त्यांच्या तीन घरांचाही समावेश आहे. यातील एक घर गुपकार रस्ता, दुसरा तहसील कटिपोरा, तन्मर्ग आणि तिसरं घर जम्मूच्या भटंडी भागातील आहे.

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आलंय. स्वतः फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्याशी संबंधित इतरांची ११.८६ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलीय. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ११.८६ कोटी असली तरी तिचं सध्याचं बाजारमूल्य हे ६० ते ७० कोटी रुपये असल्याचंही सांगण्यात येतंय.

८३ वर्षीय फारुख अब्दुल्लांची आतापर्यंत अनेकदा ईडीकडून चौकशी करण्यात आलीय. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात श्रीनगरमध्ये ईडीकडून अब्दुल्लांची चौकशी करण्यात आली होती. तर राजकीय वैमनस्यातून ही कारवाई सुरू असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सनं केलाय.