mamata and abhishek banerjee

ईडीने(Ed Summons To Mamata Banerjee Nephew ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी(MP Abhishek Banerjee) आणि त्यांच्या पत्नीला राज्यातील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित वसुली प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं आहे.

    पश्चिम बंगालमधून (West Bengal)एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने(Ed Summons To Mamata Banerjee Nephew ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी(MP Abhishek Banerjee) आणि त्यांच्या पत्नीला राज्यातील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित वसुली प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं आहे.अभिषेक बॅनर्जी लोकसभेतील डायमंड हार्बर जागेचे प्रतिनिधित्व करतात आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत.

    अभिषेक बॅनर्जींना सप्टेंबरमध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अभिषेक यांच्या पत्नी रुजीरालाही मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) समन्स पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाशी जोडलेल्या अनेकांना असे समन्स बजावण्यात आले आहेत.

    (पीएमएलए) च्या फौजदारी कलमांखाली दाखल केलेला गुन्हा, ईडीने नोव्हेंबर, २०२० मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर दाखल केला होता. ज्यामध्ये आसनसोल आणि आसपासच्या राज्यातील कुनुस्टोरिया आणि काजोरा भागातल्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड खाणींशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कोळसा चोरीचा घोटाळा होता.स्थानिक राज्य संचालक अनुप माझी उर्फ ​​लाला या प्रकरणात मुख्य संशयित असल्याचा आरोप आहे.या बेकायदेशीर व्यापारातून मिळालेल्या निधीचे अभिषेक बॅनर्जी लाभार्थी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.