राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या भेटीसाठी पोहोचले आठ आमदार, राजकीय वर्तुळात खळबळ

या आमदारांमध्ये सचिन पायलट यांचे निकटवर्तीय रामनिवास गावडिया यांच्यासोबत विश्ववेंद्र सिंह, पी.आर. मीणा, मुकेश कुमार या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या बैठकीमुळे सचिन पायलट हे भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे. 

    जयपूर –  जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता राजस्थानमधील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसमध्ये घडमोडींना वेग आला आहे. तसेच पक्षात दीर्घकाळापासून नाराज असलेल्या सचिन पायलट यांच्या गोटात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे. पायलट यांच्या गटातील आठ आमदारांनी पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

    या आमदारांमध्ये सचिन पायलट यांचे निकटवर्तीय रामनिवास गावडिया यांच्यासोबत विश्ववेंद्र सिंह, पी.आर. मीणा, मुकेश कुमार या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या बैठकीमुळे सचिन पायलट हे भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.

    ही बैठक का बोलावण्यात आली याबाबत सध्यातरी काही स्पष्ट झालेले नाही. मात्र यात काही महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा नक्कीच झाली असावी, अशी शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सचिन पायलट यांनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर वाटाघाडी समितीकडून दहा महिन्यांनंतरही काही निर्णय न झाल्याने पायलट यांनी नाजारी व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.