८ तारखेच्या ‘भारत बंद’ला तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर पाठिंबा, सर्वशक्तीनिशी टीआरएस उतरणार रस्त्यावर

देशातील भाजप आणि एनडीएतील काही पक्ष वगळता बहुतेक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीदेखील या ८ डिसेंबरच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केलाय. टीआरएस पक्ष पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून या संपात सहभागी होईल, असं राव यांनी सांगितलंय.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. इतर राज्यांतील काही शेतकरी संघटनांनीदेखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

सरकारसोबत शनिवारी झालेल्या वाटाघाटींम्ये काहीच तोडगा न निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला (मंगळवारी) भारत बंदची हाक दिली आहे. बंदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबरला (बुधवारी) शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात चर्चा होणार आहे.

देशातील भाजप आणि एनडीएतील काही पक्ष वगळता बहुतेक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीदेखील या ८ डिसेंबरच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केलाय.

टीआरएस पक्ष पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून या संपात सहभागी होईल, असं राव यांनी सांगितलंय.